🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟कंदाहार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टरमाईंड राऊफ असगरच पहलगाम हल्ल्याचाही मास्टरमाईंड असल्याचा संशय🌟

*1.आज  12 वीचा निकाल जाहीर होणार, दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार, मंगळवारपासून कॉलेजमध्ये मिळणार गुणपत्रिका ;15,13, 909 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा 

*2.पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर आणखी एक वॉटर बॉम्ब,चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचं पाणी रोखलं ; नौदल प्रमुखांनंतर वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अर्धातास झाली चर्चा, वायुदलाच्या सिद्धतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून आढावा 

*3.पहलगाम हल्ल्याचा गुप्तहेरांनी आधीच दिला होता इशारा, श्रीनगरजवळील जबरवान भागात अनेक दिवस सुरू होतं सर्च ऑपरेशन, काही स्थानिक दहशतवादी पहलगाममध्ये पर्यटकांत मिसळले असल्याची माहिती ; भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ रशियातील पाकिस्तानी राजदूताची पोकळ धमकी 

*4.कंदाहार विमान अपहरण प्रकरणाचा मास्टरमाईंड राऊफ असगरच पहलगाम हल्ल्याचाही मास्टरमाईंड असल्याचा संशय, जैशच्या बहावलपूरच्या बालेकिल्ल्यात कट शिजल्याची माहिती ;  पाकव्याप्त काश्मिरात हमासची एन्ट्री, जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाशी हातमिळवणी, पहलगाम हल्ला हमासच्या हल्ल्याशी मिळताजुळता 

*5.भारतावर गरळ ओकणाऱ्यांवर डिजिटल स्ट्राईक,पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे ट्विटर खातं भारतात बंद ; यूट्यूब चॅनेल बंद करणं म्हणजे बदला आहे का ? संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल,इंदिरा गांधींचा इतिहास बघा असा सल्ला 

*6.गोकुळचे दूध उद्यापासून दोन रुपयांनी महागणार, मुंबई-पुण्यात म्हशीचं दूध 74 तर उर्वरीत महाराष्ट्रात 68 रुपये लीटर, गाईच्या दुधातही 2 रूपयांची वाढ होऊन मुंबई- पुण्यात 58 रुपये तर उर्वरित राज्यात 50 रुपये प्रतिलीटर दर होणार 

*7.राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा,अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं ;  राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित, दरेगावात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने उपस्थित नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण 

*8.राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज ;  पूर्व विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं, आंब्याच्या बागांसह धान पिकाला मोठा फटका, गारपीटीनं भातपीक जमीनदोस्त 

*9.आधी गुंगीचे औषध दिलं,नंतर डोक्यात दगड घातला, जन्मदात्या आईसह पाठच्या बहिणीने भावाला निर्घृणपणे संपवलं आणि मृतदेहाला आग लावली, सांगली जिल्ह्यातील तासगावातील धक्कादायक घटना ; ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये जुन्या वादातून भर चौकात एकाची हत्या, अंगावर सपासप वार केले, कुऱ्हाडीने डोक्याचे दोन भाग करुन संपवले 

*10.पंजाब किंग्सने जखमी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी तगडा खेळाडू खरेदी केला, ऑस्ट्रेलियाच्या मिच ओवेनला 3 कोटीत केलं करारबद्ध                         

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या