🌟यावेळी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांना जवानांना श्रद्धांजली आर्पण करून राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप🌟
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशावरून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. परभणीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली छ. शिवाजी महाराज पुतळा-रेल्वे स्टेशन-बस्थानक-उड्डाण पूल-जांब नाका-महाराणा प्रताप चौक-विसावा चौक यु टर्न घेऊन- गणपती चौक-सरकारी दवाखाना-छ.शिवाजी म. चौक- गांधी पार्क-नारायण चाळ ते छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्याताले. यावेळी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांना व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली आर्पण करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
या रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, लोकसभा प्रमुख राजु कापसे, उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे, प्रल्हाद होगे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपटे, तालुकाप्रमुख प्रभाकर कदम, युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे, सखुबाई लटपटे, महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी, कल्पना दळवी, अर्चना चिंचाने, शेख शबीर, सचिन पाटील, बाळासाहेब मोहटे, ईशान आवचार, राहुल शिंदे, महेंद्र जोंधळे, भुजंगराव धस, संदीप जाधव, उद्धवराव गायकवाड आदी पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती.......
0 टिप्पण्या