🌟अमेरिकेत राहून परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना आता मोठा धक्का बसणार.....!


🌟अमेरिकेतून पैसे पाठवताना भरावा लागणार ५ टक्के कर : अमेरिकन संसदेत 'द वन बिग ब्युटीफूल बिल' विधेयक सादर🌟

वॉशिंग्टन : अमेरिका देशात राहून परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना आता मोठा आर्थिक धक्का बसणार आहे कारण अमेरिकेतील ट्रम्प सरकारने अमेरिकेतून विविध देशांमध्ये पैसे पाठवताना ५ टक्के कर लावण्याचे ठरवले आहे याचा मोठा आर्थिक फटका भारतीयांना बसणार आहे अमेरिकेच्या संसदेत 'द वन बिग ब्युटीफूल बिल' नावाचे विधेयक सादर झाले. या विधेयकामुळे अमेरिकेतून जगभरात पैसे पाठवणे महाग होणार आहे. कारण या विधेयकानुसार तुम्ही जर अमेरिकेचे नागरिक नसाल व परदेशात पैसे पाठवत असल्यास तुमच्या तील रकमेवर थेट ५ टक्के कर अमेरिकन सरकार कापणार आहे अमेरिकन संसदेत सादर झालेले नवीन विधेयक ३८९ पानांचे आहे. त्यातील ३२७ क्रमांकाच्या पानावर एक ओळ लिहिली आहे. यात म्हटलेय की, अमेरिकेच्या बाहेर पैसे पाठवणाऱ्यांना ५ टक्के कर लागणार आहे.

💫अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी का आणले विधेयक ?

रिपब्लिकन नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे अमेरिकेला ३.९ ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजचा खर्च काढण्यास मदत मिळेल. ट्रम्प यांच्या काळात कर कपातीची योजना येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन ४ जुलै आहे. तोपर्यंत यावर कायदा बनवण्याचे प्रयत्न केले जातील.

💫अमेरिकेत ४५ लाख भारतीय राहतात त्यामुळे भारताला मोठा आर्थिक फटका :-

अमेरिकेत ४५ लाख भारतीय राहतात. त्यातील बहुतांशी 'एच-१बी' किंवा 'एल-१' व्हिसावर आहेत. हे लोक दर महिन्याला घरी पैसे पाठवतात. आई-वडिलांना औषधासाठी, बहिणीच्या शिक्षणासाठी, कोणाच्या लग्नासाठी पैसे पाठवतात. या निर्णयाचा मोठा फटका भारताला बसणार आहे. कारण भारतीय लोक अमेरिकेतून भारतात मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवत असतात. 'आरबीआय'च्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतून भारतात २०२३-२४ रोजी ११८.७ अब्ज डॉलर पाठवण्यात आले. हा नवीन कर अंमलात आल्यास अमेरिकेला यातून १.६५ अब्ज डॉलर कर रूपाने मिळणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या