🌟महाराष्ट्र राज्यासह देशातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟राज्यात गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती, गुजरातचं कनेक्शन समोर🌟

*1. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शाह यांच्यावर 4 तासात गुन्हा दाखल करा: उच्च न्यायालय ; पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला, चीनचे हे निरर्थक प्रयत्न सत्य बदलू शकत नाहीत 

*2. महाराष्ट्राचे सुपुत्र अमरावतीचे भुमीपुत्र असलेले भुषण गवई यांची देशाच्या 52 व्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून न्यायमूर्ती भूषण गवईंना सरन्यायाधीश म्हणून शपथ ; अमरावतीत जन्म, अनेक ऐतिहासिक निकाल; माजी राज्यपाल रा.सू. गवईंचे सुपुत्र 

*3.आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची सुरक्षा पोलिस कमिशनर, SP करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्रीला ब्रेक, शासन धोरण ठरविलं जाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी नको;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश 

*4. राज्यात गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती, गुजरातचं कनेक्शन समोर; मुंबईतील जुहूमधून तिघांना अटक ; सांगली कारागृहात नेताना गजा मरणेसोबत मटण पार्टी; एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई

*5. लग्नाच्या वरातीत ठाकरे गटाचे आमदार  सिद्धार्थ खरात हातात तलवार घेऊन थिरकले, व्हिडीओ वायरल; कारवाई होण्याची शक्यता ; शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; स्थानिक नेत्यांबद्दल केली तक्रार, म्हणाल्या, मी गद्दारी केली नाही, शिवसेनेतच राहणार 

*6. खासदार अमोल कोल्हे अन् उत्तम जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच राष्ट्रवादीच्या एकीची चर्चा; आ. अमोल मिटकरींनी ठेवली अट ; अजित दादा- सु्प्रिया ताई एकत्र येतील का, तुमच्या मनात काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अनिल देशमुख मिश्किलपणे म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो 

*7. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकरांनी दिला राजीनामा; पत्रात म्हणाले, समाजकंटकांकडून राजकीय बदनामी झाल्याने व्यथित होऊन निर्णय ; पिंपरी चिंचवडमधील 29 बंगले 31 मे पूर्वी जमीनदोस्त होणार! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, हरित लवादाने ठरवले होते बेकायदेशीर

*8. वसई विरारमध्ये एकाच वेळी 13 ठिकाणी ईडीची छापेमारी, 41 बेकायदेशीर इमारतीप्रकरणी मोठी कारवाई, माजी नगरसेवक सीताराम गुप्तावर गुन्हा दाखल ; माजी सनदी अधिकारी अजय कुमार UPSC चे नवे अध्यक्ष, संरक्षण मंत्रालयाचे सचिव अन् अग्निवीर योजनेचे निर्माते*

*9. MBBS च्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवत गळ्यावर चालवली सुरी; चिठ्ठीत शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख, अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासा काढून टाकण्याची मागणी ; बीडमध्ये गतीमंद चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात बांधलं; केळी अन् टरबुजाच्या साली खायला घातल्या, बापाचं पाशवी कृत्य 

*10. चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 20 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन मायदेशी आले!; मोदीजी ने मेरा 'सिंदूर' मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद

*11. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; मुंबई, पुण्यासह राज्यातील 22 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट',  हवामान विभागाचा अंदाज 

*12. घर खरेदीदारांना आनंदाची बातमी, जुलैमध्येच ठाणे कल्याण भागात म्हाडाची 4000 घरांची बंपर लॉटरी 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या