🌟महाराष्ट्र राज्यासह देशातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟भारताने पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर 4 ब्राह्मोस क्षेपणास्त्रे डागली अवॅक्स विमानंही नष्ट केलं🌟

 ✍️ मोहन चौकेकर

*1. भारताने पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर 4 ब्राह्मोस क्षेपणास्त्रे डागली, अवॅक्स विमानंही नष्ट केलं, पाकिस्तानच्या माजी एअर मार्शलचा खुलासा, पुरावेही आले समोर ; 9 मे च्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती, डमी विमानं पाठवून पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचं लोकेशन जाणून घेतल्याची माहिती 

*2. नाश्त्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेत तुम्ही दुश्मनांचा सूपडा साफ केलात, भूज एअरबेसवर जाऊन राजनाथ सिंहांकडून सैनिकांचं कौतुक ; पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरनंतर मोठं पाऊल, संरक्षण बजेटमध्ये 50 हजार कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव, आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलं जाणार 

*3. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार, एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगण्याची शक्यता ;  भारताने कंत्राट रद्द केल्यानंतर तुर्कीच्या Celebi  कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी गडगडले 

*4. गोध्रा हत्याकांडावेळी एका व्यक्तीला फोन करुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अमित शाहांना वाचवले होते, 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात खासदार संजय राऊतांचा दावा  ; गोध्राकांडात  नरेंद्र मोदींना अटक करु नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती, नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दावा, अमित शाहांच्या जामीनासाठी प्रयत्न केल्याचा दावा  ; कथाकादंबऱ्या आणि बालसाहित्य वाचायचं माझं वय नाही, राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपहासात्मक टोला 

*5. ठाण्यात सिमेंटऐवजी डांबरी रस्ता केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनखात्याच्या अधिकाऱ्यांवर भडकले, लोकांच्या जीवापेक्षा तुम्ही मोठे नाही, उद्या अपघात झाल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा 

*6. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये सत्ताबदलाच्या हाचलाली, अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा देण्याऐवजी अरुण डोंगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, डोंगळेंना सत्तेची हाव सुटल्याची मंत्री हसन मुश्रीफांची टीका, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गोकुळच्या राजकारणात लक्ष घातलीत असं वाटत नाही, सतेज पाटलांची प्रतिक्रिया 

*7. मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामीप्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची साडे तीन तास चौकशी, मंत्री  जयकुमार गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद झाल्याचं उघड 

*8. केरळमध्ये 27 मे तर महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन अपेक्षित, हवामान खात्याता अंदाज 

*9. बीड जिल्ह्यात भरधाव कंटेनरने एकास चिरडले, 8 ते 10 गाड्यांना धडक, संतप्त जमावाने कंटेनर जाळला ; पुण्यात पुन्हा कोयता गँगचा थरार, भररस्त्यात तरुणावर जीवघेणा टोळक्याचा हल्ला, व्हिडीओ समोर 

*10. क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव, शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्माच्या नावाने स्टँडचं नामकरण, एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळेंच्या नावाने ऑफिस लाऊंज  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या