🌟तेलंगणाची राजधानी हैदराबाद शहरातील चारमिनार परिसरात अग्नितांडव : १७ जणांचा मृत्यू यात ८ मुलांचा समावेश..!


🌟शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय असून १० ते १५ जणांना आगीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले🌟

हैदराबाद :- तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबाद शहरातील चारमिनार जवळील गुलजार हाऊसमधील एका इमारतीला काल रविवार दि.१८ मे २०२५ रोजी सकाळी लागलेल्या आगीच्या घटनेत तब्बल १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यात ८ मुलांचा समावेश आहे. 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय असून १० ते १५ जणांना आगीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तीनमजली इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे तळमजल्यावरील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. सकाळी साडेसहाच्या सुमारास अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या कचाट्यात सापडल्याने अनेकांना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जखमींना त्वरित उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि एआयएमआयएमचे आमदार मुमताज अहमद खान यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या