🌟गेल्या २१ वर्षांत सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले ते ऑस्ट्रेलियाचे पहिले पंतप्रधान ठरले🌟
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी अँथनी अल्बनीज यांनी सलग दुसऱ्यांदा विराजमान होण्याचा मान पटकावला. गेल्या २१ वर्षांत सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले ते ऑस्ट्रेलियाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. विरोधी नेते पीटर डटन यांनी शनिवारी झालेल्या निवडणुकीत आपला पराभव मान्य केला. ते म्हणाले की, "या संपूर्ण प्रचारादरम्यान आमची कामगिरी चांगली झाली नाही. या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो." या विजयाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँथनी अल्बनीज यांचे कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या