🌟पाकिस्तानने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर मिसाईल सोडलं होतं ; भारतीय लष्कराचा खळबळजनक गौप्यस्फोट🌟
✍️ मोहन चौकेकर
*1. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबर ज्योती मल्होत्रानंतर 11 जणांना बेड्या मोठं रॅकेट उघड ; हेरगिरी प्रकरणात कसून चौकशी ; मोदीजी,पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठेत,तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय ? वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा खरमरीत सवाल ; पाकिस्तानने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर मिसाईल सोडलं होतं ; भारतीय लष्कराचा खळबळजनक गौप्यस्फोट ; चूक नाहीच, तो गुन्हा होता ; पाकिस्तानला पहिल्यांदा माहिती दिल्याने भारताने किती विमाने गमावली? सत्य देशाला कळलंच पाहिजे; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'तो' व्हिडिओ शेअर करत पुन्हा घेरले
*2. आपला विजय झालेला नाही, शस्त्रसंधी झालीय, भारतीय जवानांच्या प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा; मनसे नेते अमित ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र ; जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही, तिरंगा रॅली म्हणून हा कार्यक्रम होत आहे; अमित ठाकरेंच्या पत्रावरुन मंत्री उदय सामंतांचा टोला ; भारत-पाक शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान मोदींना पत्र पाठवणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले...हा सगळा बालिशपणा सुरु आहे
*3. कर्जासाठी शेतकऱ्यांकडे CIBIL मागू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ICICI, HDFC आणि Axis बँकेला फटकारले ; अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका, 27 हजार हेक्टर क्षेत्र बाधित, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती, सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात
*4. विधानभवनाच्या एन्ट्री गेटवर शॉर्ट सर्किट झाल्याने लागली आग, धुराचे लोट पाहून उडाला गोंधळ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनास्थळावरुन दिली माहिती; अग्निशन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात कोणतीही जीवितहानी नाही
*5. पुणे जिल्ह्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धमाका, पॅनलचे सर्वच उमदेवार निवडुन आले ; अजितदादांनी कंत्राटदाराला धरलं धारेवर; परळीतील वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांचं काम खराब झाल्याचं सांगत सुनावले खडे बोल ; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या व्हिआयपी दौऱ्याचा रुग्णांना फटका, नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले, बीडमधील प्रकार
*6. खरीप हंगामात कोणतेही अधिकारी रजेवर जाणार नाहीत, अन्यथा कारवाई, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा इशारा, अधिकाऱ्यांना फटकारले ; मुसळधार पावसाने शिक्षण विभागाच्या कार्यालयात पाणीच पाणी; महत्त्वाच्या फाईल्स भिजल्या, उन्हात वाळायला ठेवल्या; धुळे शहरातील प्रकार
*7. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर रोहित पवारांना राज्यात मंत्री करायचे असल्याने याचा फटका छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना बसणार; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा ; उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन पकडल्यास त्यांना सोन्याचे दिवस येतील; लक्ष्मण हाकेंचे वक्तव्य
*8. पाऊस उघडल्यावर तटकरेंचा कार्यक्रम लावू, भरत गोगावलेंचा हल्लाबोल, म्हणाले, आम्ही वेटरसारखा नॅपकिन खांद्यावर घेत नाही ; अमरावतीत राणा-खोडके वाद पुन्हा चव्हाट्यावर; नवनीत राणा म्हणाल्या, महापौर भाजपचाच; तर युती होणं शक्यच नाही, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंचा इशारा
*9. खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावर अपघात, कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू ; कोल्हापुरात सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी; साडेदहा लाखांची लूट ; जालन्यात भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले, रस्त्यावरून कार पलटत खाली, मायलेकीचा मृत्यू, 3 गंभीर ; जुना वाद उफाळला, चाकू कोयते घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले, 3 जण जागेवरच संपले, 4 गंभीर,मुंबईतील दहिसरमध्ये थरार
*10. भारत आशिया कप खेळणार नाही या संदर्भातील बातम्या खोटया, टीम इंडियाच्या सहभागासंदर्भात कोणतीही बैठक झालीच नाही; बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांचे स्पष्टीकरण ; इंग्लंडच्या कॅप्टन बेन स्टोक्सनं दुखापतीतून सावरण्यासाठी सोडली दारू, भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी मोठा निर्णय
*11. आशियात कोरोनाचा JN1 व्हेरिएंट वेगाने पसरण्यास सुरुवात; सिंगापूरमध्ये 14 हजार नवीन रुग्ण आढळले; चीन, हाँगकाँग, थायलंड सतर्क
*12. कर्नल सोफिया कुरेशीबाबत भाजपचे मध्यप्रदेशचे मंत्री विजय शहा आधी नको नको ते बोलले; आता कोर्टात हात जोडत गडगडले, न्यायमूर्ती म्हणाले, मगरीचे अश्रू
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या