🌟देशामध्ये प्रथीत यश असलेला सीबीएससी पॅटर्न परीक्षेमध्ये वर्ग दहावी मध्ये घवघवीत यश तिने संपादन केले🌟
पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमित ठसा उमटवणारे राज्यस्तरीय सरपंच सेवा संघाचा पुरस्कार प्राप्त माजी सरपंच स्वर्गवासी शिवाजीराव कोंडीबा साखरे यांची सुकन्या सपना हिने आपल्या वडिलांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केले.
देशामध्ये प्रथीत यश असलेला सीबीएससी पॅटर्न परीक्षेमध्ये वर्ग दहावी मध्ये घवघवीत यश तिने संपादन केले आहे. जवळपास प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क्स घेऊन देय दीपमान यश संपादन केले आहे स्वर्गवासी शिवाजीराव साखरे यांना अतिशय कमी आयुष्य लाभलं. परंतु असं म्हटलं जातं माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला कोणत्या विचारावर जगला या बाबीला अनन्यसाधारण महत्त्व आहे धनगर टाकळी चा सर्वांगीण विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरपंच पदाच्या कालखंडामध्ये संपूर्ण गावाचा चेहरा मोहरा त्यांनी बदलवला.
जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन विशुद्ध मानवतेवर प्रेम करणारे शिवाजीराव शाश्वत काळासाठी कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहतील. रयतेचे आदर्श राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी प्रजाहित दक्ष राजे मल्हारराव होळकर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ आदर्श राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले थोर मानवतावादी संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज धनगर टाकळी येथील संत दाजी महाराज
यांची मानवतेची सहिष्णतेची परोपकाराची बंधू भावाची शिकवन आचरणात आणून त्यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला भक्ती भावाने आपल्या मित्र परिवारासोबत जाणारे शिवाजीराव वारकऱ्यांच्या दिंडीला दरवर्षी भोजनदान द्यायचे मनसोक्त किर्तनामध्ये रंगून जायचे. यामध्ये कधी कधी खंड पडला नाही गावामध्ये वृक्षारोपण प्रशस्त सिमेंट काँक्रीटचे रस्ते सांड पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या गावकऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पानी स्मशान भूमी कडे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता अंतिम संस्कार साठी उभारलेले सुसज्ज शेड त्या ठिकाणी केलेले विपुल प्रमाणावर वृक्षरोपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच उच्च दर्जाचे मार्बल लावून केलेलं सुशोभीकरण जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी राबविलेले उपक्रम कायमस्वरूपी स्मरणात राहतील ते एक आदर्श संस्कारक्षम कुटुंब वस्तल कुटुंबप्रमुख होते बालपणी आपणाला परिस्थिती अभावी शिक्षण घेता आलं नाही वडिलांचे छत्र लहानपणीच हरवलं अजाणत्या वयामध्ये कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली परंतु आपल्या मुला मुलींना भावाच्या मुला मुलींना बहिणीच्या मुला मुलींना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ते आग्रही राहिले त्यांनी मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या आंबेजोगाई या ठिकाणी आपल्या मुला मुलीला ठेवत त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं त्यांचे सुपुत्र अजित मागच्या वर्षी बारावी परीक्षेमध्ये विज्ञान शाखेमध्ये नेत्र दीपक असे यश संपादन केले मागच्या वर्षी शिवाजीराव खूप आजारी होते त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती. परंतु त्यांनी आपल्या आजारपणाच्या दुःख वेदना ह्याची जाणीव कुणालाही होऊ दिली नाही अखेरच्या क्षणापर्यंत ते अतिशय प्रफुल्लित राहिले. मृत्यूला थोडे सुद्धा घाबरले नाहीत त्यांनी सांगितले मी मरण पावल्यानंतर माझा पार्थिव देह फार्म हाऊस वर ठेवा गावामध्ये रस्ते अरुंद आहेत. अंत्यविधीसाठी येणाऱ्यांची गैरसोय व्हायला नको. आणि त्या पद्धतीनेच त्यांचं पार्थिव त्यांच्या फार्म हाऊस वर ठेवण्यात आलं.
या अंतयात्रेमध्ये मोठा जनसागर साश्रू नयनांनी उपस्थित होता सर्व जाती-धर्माचे लोक सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची धर्मगुरूंची संतांची उपस्थिती होती या डोंगराएवढ्या दुःखातून आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करणारी त्यांचे सुपुत्र अजित व आत्ताच सीबीएससी दिल्ली बोर्ड परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन करणारी त्यांची सुकन्या सपना हिन आपल्या वडिलांचा स्वप्न साकार केल तिच्या या नेत्र दीपक यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा
याही पुढं तिने यशवंत गुणवंत किर्तीवंत शीलवंत होऊन आपल्या आई-वडिलांचा आणि घराचा वैभव शाली वारसा पुढे न्यावा ही अपेक्षा....!
शुभेच्छुक
श्रीकांत हिवाळे सर
सेवानिवृत्त शिक्षक राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी.
0 टिप्पण्या