🌟 नांदेड येथे पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत शाखा भक्ती लॉन्सच्या वतीने मोफत विशेष उन्हाळी योग शिबिराचे आयोजन.....!


🌟सर्वत्र उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे या निमित्ताने विशेष योग शिबिराचे आयोजन🌟


नांदेड (दि.02 मे 2025)
:- प्रतिनिधी - पतंजली योगपीठ हरिद्वार यांच्या अंतर्गत नांदेड येथील भक्ती लॉन्सच्या नित्य योग शाखेच्या वतीने उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून संपूर्ण महिनाभर विशेष मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या दिड वर्षापासून नांदेड येथील मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स मंगल कार्यालयात नित्य नियमाने पतंजली योगपीठ हरिद्वार यांचे अंतर्गत  रोज सकाळी 5 ते 7 मोफत योग वर्ग घेतला जातो.

     पतंजली योगपीठ हरिद्वार योग शिक्षक पुरस्कार प्राप्त योगाचार्य सिताराम सोनटक्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या योग वर्गात नित्यनियमाने रोज 300 चे 400 योग साधक योग साधनेसाठी हजेरी लावतात. या योग वर्गात ओमकार ध्यान, प्राणायाम, विविध प्रकारची योगासन, आणि काही व्यायामाचे प्रकार, सूक्ष्म व्यायाम आदी 150 प्रकार दररोज दोन तासात घेतले जातात सदरील योग अभ्यास पतंजली योगपीठाने घालून दिलेल्या नियमाधीन असतो. 

      या दैनंदिन योग अभ्यासामुळे अनेकांचे छोटे-मोठे व दुर्धर आजार  पूर्णपणे बरे झाले आहेत. भक्ती लॉन्स या मुख्य शाखेतून स्नेहांकित कॉलनी, सिंचन नगर व प्रगती नगर अशा उपशाखा सुरू झालेल्या आहेत. येत्या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून एकूण 21 नित्ययोग शाखा सुरू करण्याचा संकल्प भक्ती लॉन्स शाखेने केला आहे.

       दिनांक 2 मे पासून सर्वत्र उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे या निमित्ताने विशेष योग शिबिराचे आयोजन महिनाभर करण्यात आले आहे. भक्ती लॉन्स मंगल कार्यालय मालेगाव रोड येथे सकाळी 5 ते 7 या वेळेत मोफत चालणाऱ्या ह्या शिबिराचा स्वतःचे व परिवाराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी, आपले दुर्धर, विविध छोटे मोठे आजार पुर्णपणे बरे करण्या साठी अबालवृद्धानी लाभ घ्यावा असे आवाहन भक्ती लॉन्स शाखेच्या वतीने योगाचार्य सिताराम सोनटक्के यांनी केले आहे.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या