🌟परभणी जिल्ह्यात गोरगरीब शिधापत्रिका धारकांच्या तोंडचा घास शासकीय स्वस्त धान्य माफियांच्या घशात ?


🌟परभणी शहरातील कोतवाली पोलिसांनी पकडला ४० क्विंटल शासकीय स्वस्त धान्य साठ्यातील तांदूळ ?🌟

 परभणी : परभणी जिल्ह्यात गोरगरीब शासकीय शिधापत्रिका धारकांच्या तोंडचा हक्काचा घास आज देखील शासकीय स्वस्त धान्य माफियांच्या घशात सोईस्कर रित्या घातला जात असल्याचे निदर्शनास येत असून शासकीय स्वस्त धान्याचा (रेशन) काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्या असून यात शिधापत्रिका धारकांची नोंदणी,शासकीय स्वस्त धान्य दुकानांची नियमित तपासणी,संगणकीय प्रणालीचा काटेकोरपणे वापर तसेच अन्नसुरक्षा अधिनियम-१९५५ या कायद्याची कडक अंमलबजावणी यांचा समावेश होतो परंतु यानंतर देखील परभणी जिल्ह्यात सर्वत्र शासकीय स्वस्त धान्याचा काळा कारभार थांबता थांबत नसल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यात कुंपणानेच शेत गिळंकृत करावे अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत असून परभणी शहरातील कोतवाली पोलिसांनी नवा मोंढा परिसरात काल बुधवार दि.१४ मे २०२५ रोजी एका वाहनातून तब्बल ४० क्विंटल तांदूळ जप्त केल्याने खळबळ माजली आहे

कोतवाली पोलिसांनी जप्त केलेला ४० क्विंटल तांदुळ स्वस्त धान्य दुकानाचा असावा व तो काळ्या बाजारात विक्री करीता जात असावा असा संशय व्यक्त होत असला तरी सदरील तांदळाच्या साठा शासकीय स्वस्त धान्य प्रणालीतलाच आहे याची पुष्टी संबंधित अधिकारी करतीलच यांची कुठल्याही प्रकारची शास्वती नसल्याने 'अंधेर नगरी चौपट राज' याचा प्रत्यय पुन्हा एकदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात पुरवठा खात्यास पत्र पाठवून खुलासा मागविला आहे.

            कोतवाली पोलिस ठाण्यातील एका पथकास नवा मोंढा परिसरात एका वाहनातून तांदुळ आढळून आल्याची माहिती कळाली तेव्हा पोलिस निरीक्षक संजय ननवरे, पोलिस उपनिरीक्षक बी.एस. चव्हाण यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून एम.एच.१६ सी.डी.१०४५ या क्रमांकाचे वाहन ताब्यात घेतले. वाहनचालकाची चौकशी केली तेव्हा वाहनधारकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या