🌟परभणी ते पाथरी या रस्त्यावर कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड.....!


🌟पोलिसांनी केलेल्या कारवाईत २१ जणाच्या विरोधात धाडसी कारवाई : हुक्का व साहित्यासह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त🌟

परभणी : परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काल गुरुवार दि.१५ मे २०२५ रोजी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास परभणी-पाथरी या रस्त्यावर सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्या समोर कॅफेच्या नावाखाली बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविणाऱ्यावर धाड टाकून २१ हुक्का शौकीनावर कारवाई केली स्थागुशाने केलेल्या कारवाईत हुक्का व त्याचे साहित्यासह १ लाख २३ हजार ९४० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

पाथरी रस्त्यावर सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्या समोर कॅफे अर्बन लंग्ज नामक कॅफेवर महाविद्यालयाच्या समोर कॅफे अर्बन लंग्ज नामक कॅफेवर अनाधिकृतरीत्या हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षकांना मिळाल्या पाठोपाठ स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह पथकाने त्या ठिकाणी छापा मारला व सिगारेट व इतर तंबाखूची उत्पादने, हुक्का व अन्य साहित्य जप्त केले. पोलिसांनी या कॅफेचे मालक सय्यद अशफाक सय्यद मुश्ताख, कर्मचारी सय्यद साबेर सय्यद सरवर, अजित सचिन सातपुते या तीघांसह मोहम्मद मुस्तकील मोहम्मद आझम,सय्यद तजबीब सय्यद असद, सय्यद अहेतशाम सय्यद अशरफ,फरा खान समंदर खान,शेख फरहान शेख इस्माईल,सय्यद जावेद,मुजाहेद अली खान,फरहान सुफियाना खान शरीफ,कृष्णा राजेश अग्रवाल, सागर किशोर होतवाणी, शहदविहान अ. हफीज, सय्यद समीर सय्यद रशीद, फैजाद खान बहिरान खान, सय्यद आरेफ सय्यद वहाब, शेख इम्राण शेख सिराज, आमेर खान पीर खान, जियान खान फैजूल्ला पठाण, अनस अशरफ साया, तौसिफ खान हाशमी यांना ताब्यात घेतले.

पोलिस निरीक्षक विवेक पाटील,सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत किणगे,पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे,अजित बिरादार, चंदनसिंह परिहार,रविकुमार जाधव,सूर्यकांत फड,रंगनाथ दुधाटे, राजू परसोडे,सचिन भदर्गे,हनवते,सिध्देश्वर चाटे,गजानन क्षीरसागर, संजय घुगे,नामदेव दुबे,राम पौळ,हनुमान ढगे,दिपक मोदीराज व सावंत यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी ही कारवाई केली....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या