🌟पुर्णा शहराला पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सिध्देश्वर धरणाचे चार गेट खुले नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा🌟
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातील सिध्देश्वर धरणातून पुर्णा नदीपात्रात काल शनिवार दि.03 में 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता धरणाचे चार गेट उघडून पुर्णा शहराला पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने 2058 क्युसेस पाणी सोडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्णा शहर पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने आज दुपारी 12.00 वाजता सिद्धेश्वर धरणाचे 4 गेट 0.3 मी. ने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाचे एकुण 4 दरवाजे 0.3 मी. ने सुरू होऊन त्याद्वारे 2058 cusecs ( 58.28 Cumecs ) इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे Spillway गेट मुळे पुर्णा नदीपात्रात ( Spillway gate - + waste weir 00 Cusecs ) असा एकुण 2058 Cusecs ( 58.28 Cumec) एवढा विसर्ग सोडला जात आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असे आवाहन सिद्धेश्वर धरण,पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने कळवण्यात आले आहे........
0 टिप्पण्या