🌟ऋषिकेश बोकारे इयत्ता १० वी परिक्षेत ९८.२ टक्के एवढे भरघोस गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील अभिनव विद्या विहार प्रशालेतील विद्यार्थी ऋषिकेश मोतीराम बोकारे याने दहावी परीक्षेत तब्बल ९८.२ टक्के एवढे भरघोस गुण मिळवून पुर्णा तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील रहिवासी असलेल्या ऋषिकेश बोकारे ऋषिकेश बोकारे याने अत्यंत अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करीत इयत्ता १० वीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे तालुक्यातील कान्हेगाव येथून जवळपास २० किलोमीटर सायकल वरुन प्रवास करीत ऋषिकेश हा दररोज पुर्णा येथील अभिनव विद्या विहार या शाळेत येणे जाणे करीत असे त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.......
0 टिप्पण्या