🌟पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील राजर्षी शाहू विद्यालयाच्या इयत्ता 10 वी च्या निकालाची परंपरा कायम.....!


🌟इयत्ता 10 वी वर्गातील सोळा विद्यार्थी विशेष प्राविण्यात उत्तीर्ण🌟 

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील श्री जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालयचा इयत्ता दहावी चा निकालाची परपरां यावर्षी  ही कायम ठेवत एकुण 92:72% निकाल लागला आहे ग्रामीण भागातील एक चांगले विद्यालय म्हणून ओळख निर्माण करुन या वर्षी  एकुण 55 विध्यार्थी.   शालांत दहावी बोर्ड  परिक्षेत बसले होते त्यापैकी 16 विद्यार्थी विशेष प्राविण्यात [Distinction ]मध्ये आले तर 14 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असून 20 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

या मध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे  शाळेत प्रथम येण्याचा मान श्रुती खंदारे हिने 91.00 %गुण घेऊन पटकावला तर द्वितीय क्रमांक मानसी मोरे 86.40 % व शुभम खंदारे याने 85.60 %गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले या व्यतिरिक्त प्रमिला घाटोळ 84.40 %,मोहन लिंगायत 82.80 %,कोमल ढेरे 82.20 % तर दिपाली मोरे हिने 80.60 % गुण प्राप्त केले शाळेतील या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ.मोहनराव मोरे, संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ.रजनीताई भगत  विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव,  बबनराव बगाटे, गंगाधर सोनटक्के  ,सुनिल पारवे ,दत्तात्रेय गंगोञे ,बबन पारवे देवानंद भारती, प्रा उत्तमराव मोरे ,प्रा प्रदीप कदम,प्रा.सतीश भालेराव  प्रकाश महाजन  संदिप विश्वासराव,सत्यम खंडागळे   मारोती मुंडे ,  रनमले ,  लहाने मामा.आदिनी विशेष अभिनंदन केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या