🌟कामकाजातील आधुनिकता व तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे तसेच वैयक्तिक आरोग्याचा समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन🌟
परभणी :- मंत्रालय मुंबई येथे महसूल,नोंदणी व मुद्रांक तसेच भूमि अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टेक वारी (TECH-वारी) या विशेष कार्यशाळेचे आयोजन आज सोमवार दि.05 मे ते 09 मे 2025 या कालावधीत करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, कामकाजातील आधुनिकता व तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे तसेच वैयक्तिक आरोग्याचा समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार, या प्रशिक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी (वर्ग 1 ते 4) यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तहसील कार्यालयातून अनिवार्य उपस्थिती अपेक्षित आहे कार्यशाळेतील उपस्थितीची माहिती प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयास ई-मेलद्वारे (rdcparbhani@gmail.com) सादर करणे बंधनकारक आहे या उपक्रमातून कामकाजात अधिक कार्यक्षमता आणि तांत्रिक सक्षमता येण्याची अपेक्षा आहे. “या प्रशिक्षणाचा लाभ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावा,” अशी सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे......
0 टिप्पण्या