🌟मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सुचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी ४ दिवस येलो अलर्ट....!


🌟जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे🌟

नांदेड :- राज्यातील मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने काल मंगळवार दि.२९ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या अत्यंत महत्वपूर्ण सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि.२९ एप्रिल ते दि.०२ मे २०२५ हे चार दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे काल दि.२९ एप्रिल ते आज बुधवार दि.३० एप्रिल या दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे तर दि.१ मे २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची व दुपारनंतर संध्याकाळी विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २ मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेचा कडकडाट ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी. यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नांदेड जिल्हा प्रशासनाने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या