🌟हातामध्ये टेंभा मशाल गळ्यामध्ये निळ्या रंगाचा गमच्या व हातामध्ये भगवा झेंडा घेऊन प्रहारचे जोरदार आंदोलन🌟
परभणी - शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, पेरणी ते कापणी एम.आर.ई. जी.एस. च्या माध्यमातून झाली पाहिजे व दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील २८८ आमदारांच्या घरासमोर टेंभा मशाल आंदोलन घेण्यात आले. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने आज परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना ताई बोर्डीकर साकोरे यांच्या कार्यालयासमोर व परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील व पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा विटेकर यांच्या सोनपेठ येथील घरासमोर टेंभा मशाल आंदोलन घेण्यात आले.
हातामध्ये टेंभा मशाल गळ्यामध्ये निळ्या रंगाचा गमच्या व हातामध्ये भगवा झेंडा घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे अशा घोषणा देत राज्य सरकारच्या विरोधातही मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वतीने डॉ. विवेक नावंदर यांनी स्वीकारले तर पाथरीचे आमदार राजेश दादा विटेकर यांनी स्वतः निवेदन स्वीकारले व शेतकरी कर्जमाफी हमीभाव व इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे व विधिमंडळामध्ये प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आंदोलनाची तीव्रता पाहता आंदोलन स्थळी आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात ठेवण्यात होता. तसेच आंदोलन करण्यात येऊ नये याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने दोन दिवसापूर्वीच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना १६८ नुसार नोटीस देण्यात आल्या होत्या.
परभणी येथे झालेल्या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, परभणी तालुका प्रमुख उद्धवराव गरुड, पूर्णा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, शहर प्रमुख अंकुश गिरी, पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे, विष्णू भोकरे, केशव जाधव, सय्यद मुस्तफा, हेमराज पाटील, गंगाधरराव लिजडे, शेषराव लिजदे, अरबाज पठाण यांनी तर सोनपेठ येथे झालेल्या आंदोलनात मानवत तालुकाप्रमुख माणिक राठोड, पाथरी तालुका प्रमुख दीपक खुडे, अशोक मस्के, मकसुद पठाण, विशाल चव्हाण, संतोष झिरपे, कृष्णा खरात यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या