🌟मुंबई इंडियन्सने पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे🌟
मुंबई :- मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाची घौडदौड आयपीएल २०२५ स्पर्धेत सुरवातीला अडखळत झाली असली तरी आता मात्र मुंबई इंडियन्स संघाच्या विजयाची गाडी रूळावरून सुसाट धावू लागली आहे.
रविवारी २७ एप्रिल रोजी दुपारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने लखनौ सुपर जायंट्स संघाला ५४ धावांनी हरवले. मुंबईच्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निर्धारीत २० षटकांत लखनौचा संघ सर्वबाद १६१ धावा करू शकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सने पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
0 टिप्पण्या