🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश🌟
मुंबई :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने मेटासोबत करार केला आहे त्या करारानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आरोग्य विषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक तरतूद वाढवण्यासाठी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून निधी घ्यावा. त्यासाठी एक संस्था स्थापन करावी. ही संस्था सीएसआर निधी मिळवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नागरिकांच्या सेवेसाठी उपयोगात आणेल. संस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सीएसआर यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करेल. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात यावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.....
0 टिप्पण्या