🌟महाराष्ट्र राज्यातील १३२ रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यात येणार...!


🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील १३२ रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करुन जागतिक दर्जाचे करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी करण्यात आली.

महाराष्ट्रातील जुने व नवे रेल्वे प्रकल्प आणि इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, गोंदिया बलारशहा रेल्वे मार्गाच्या दुहेरिकरणाच्या कामाला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणामुळे छत्तीसगडसोबत व्यापार वाढू शकतो. १ लाख ७३ हजार कोटी राज्यात रेल्वे खर्च करतंय. तसंच राज्यातील १३२ रेल्वे स्टेशन जागतिक पातळीचे केली जाणार आहेत. महाराष्ट्राला यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे विकास कामांसाठी २४ हजार ७०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार असून यात १० दिवसांची टूर सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. मुंबई परिसरासाठी हजार कोटींची कामे सुरू आहेत. २३८ एसी गाड्या मुंबईसाठी दिल्या जाणार असल्याची माहिती यावेळी आश्विनी वैष्णव यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या