🌟परभणी जिल्ह्यातील सेलूतील नूतन विद्यालयाचे ३० विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत ठरले पात्र.....!


🌟अंतिम निकालात २० विद्यार्थी परभणी जिल्हा शिष्यवृत्तीधारकांच्या गुणवत्तायादी झळकणार आहेत🌟



परभणी
:- महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेद्धारा फेब्रुवारी-२०२५ मध्ये आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत परभणी जिल्ह्यातील सेलू येथील नूतन विद्यालयातील इयत्ता ०५ वी पाच व ०८ वी वर्गातील पंचवीस असे एकूण ३० विद्यार्थी पात्र ठरले आहेत अंतिम निकालात २० विद्यार्थी परभणी जिल्हा शिष्यवृत्तीधारकांच्या गुणवत्तायादी झळकणार आहेत.

        या यशस्वी विद्यार्थ्यामध्ये आठवीतील साईराज दौड, दत्तप्रसाद लव्हराळे, मृणमयी इक्कर शिवम वैद्य, पार्थ चौधरी, मैथिली मोरे, आरिजखान पठाण, अर्णव क्षीरसागर, सत्यम गुगाणे, आशिष ताठे, शाश्‍वत संघई, विनय बेले श्रीनिवास पांडे, स्वराज पांडे, आरूष शेळके, अधिराज पंतगे, अभिजीत बोराडे, अनुष्का चव्हाण, आविष्कार ताठे, रामेश्‍वर मुंढे, तेजस्वी सोलापुरे, गौरी डोईफोडे, रूद्रांश हट्टेकर, नम्रता बोराडे, अंकिता खरात,तर पाचवीतील आर्या कुलकर्णी, शिवराज आवटे, स्वराज सोंजे, ओम उदावंत, गौरी पत्रे यांचा समावेश आहे.

           आठवीसाठी विभाग प्रमुख सुनील तोडकर, अरविंद आंबेकर, बाळू बुधवंत, प्रभू भुसारे, पाचवीच्या विद्यार्थ्यांना बन्सीधर पद्मावत, आरती कदम, वर्षा कदम, गजानन मुळी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, एस.व्ही.पाटील, के.के.देशपांडे, आर.एस.मोगल आदींसह विविध स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या