🌟नांदेड येथील गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचाऱ्यावर होत असलेल्या अन्याय व प्रशासकांच्या गैर करोभारा विरोधात धरणे आंदोलन संपन्न...!


🌟बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुद्वारा गेट नंबर 01 समोर करण्यात आले धरणे आंदोलन🌟           

नांदेड (दि.१० एप्रिल २०२५) :- नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डातील कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांच्या गैरकारभारा विरोधात बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजूरी साध संगत च्या वतीने गुरुवार दि.१० एप्रिल २०२५ रोजी  गुरुद्वारा गेट नं ०१  समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा बोर्डावर महाराष्ट्र शासन नियुक्त प्रशासक विजयसतबीरसिंघ सातत्याने मनमानी व गैरकारभार चालवला असून संबंधित गुरुद्वारा बोर्डाचे  कार्यरत भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पाठबळ देऊन त्यांना वाचवण्याचा काम करत असून व जेष्ठ कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यास टाळाटाळ करीत त्यांच्यावर अन्याय करीत आहेत या संदर्भात दोन महिन्यापूर्वी  गुरुद्वारा बोर्डात कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कार्य काळानुसार प्रमोशन देण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन एक कमिटी गठीत करण्यात आली होती परंतु ती कमिटी पण थंडगार बसली असे नजरेत आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पन्नोत्रीसाठी ह्या कमिटीच्या माध्यमातून दोन महिने उलटून सुद्धा प्रशासकाने कोणता ठोस निर्णय घेतला नाही त्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले येणाऱ्या दहा दिवसांमध्ये मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या 21 एप्रिल पासून बेमुदत साखळी उपोषण ची सुरुवात गुरुद्वारा गेट नंबर एक समोर करण्यात येईल असा इशाराही संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी दिला. त्यावेळी बिरेंद्रसिंघ बेदी, दीपक सिंघ गल्लीवाले, दिवानसिंघ बुंगई, महेलसिंघ लांगरी, संपुरणसिंघ गिल,राजासिंघ फौजी,माजी गुरुद्वारा बोर्ड सदस्य जसपालसिंघ लांगरी, जर्नलसिंघ गाडीवाले, महेंद्रसिंघ पैदल, नरेंद्रसिंघ चिरागिया, मनिंदरसिंघ (राज) रामगडीया, प्रितपालसिंघ शाहू, आम आदमी पक्षाचे नरेंद्रसिंघ ग्रंथी,तेजपालसिंघ खेड,बलबीरसिंघ सुरेंद्रसिंघ मेंबर, जगदीपसिंघ नंबरदार, देवेंद्रसिंघ महाजन, अमोलकसिंघ गल्लीवाले,जसपालसिंघ लाखवाले, कश्मीरसिंघ भट्टी बक्षीसिंघ पुजारी,अत्तरसिंग आत्मासिंग,उपस्थित होते......

                                                                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या