🌟असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,परभणी यांनी केले आहे🌟
परभणी (दि.२३ एप्रिल २०२५) : परभणी जिल्ह्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र, इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी "मुख्यमंत्री वयोश्री योजना" राबविण्यात येते.
या योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी शहर महानगरपालिका, सर्व नगरपरिषद/नगरपंचायत व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे मार्फत एकत्रीत ४३ हजार ७९६ अर्ज प्राप्त झालेले असुन छाननीअंती ४१ हजार ७९६ अर्जाना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत cmvayoshree.mahait.org या वेबसाईटवर लाभार्थीचे आवेदनपत्र शासनास ऑनलाईनप्रणाद्वारे सादर करण्यात आलेले आहेत. एकुण सादर केलेल्या आवेदनपत्रापैकी २१ हजार ५७५ लाभार्थ्यांचे बँकखाते आधार संलग्न आहेत. त्यानुसार शासनाने १८ हजार ८५१ लाभार्थ्यांना प्रत्येकी एकवेळ एकरकमी रुपये तीन हजार लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे थेट वितरण करण्यात आलेले आहे.
वितरीत केलेल्या निधीबाबत लाभार्थ्यांनी सहाय्य साधने /उपकरणे खरेदी केलेल्या (उदा. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर इ.) साहित्य किंवा मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र, इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी डॉक्टराकंडुन केलेल्या उपचार किंवा सबंधित दुकानदाराकडुन खरेदी केलेल्या निधीचा उपयोग कशा प्रकारे केलेला आहे अशा वस्तुंचे इनव्हाइस/पावती आपल्या जवळील परभणी शहर महानगरपालिका, नगरपरिषद/नगरपंचायत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास पावती सादर करावी तसेच ज्या लाभार्थ्यांनी आपले बँकखाते आधारसलंग्न केलेले नसल्यास तात्काळ बँकेशी आपले बँकखाते आधारसंलग्न करावे जेणे करुन "मुख्यमंत्री वयोश्री योजना" या याजनेची रक्कम आपल्या बँकेमध्ये जमा होईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, परभणी यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या