🌟पालकमंत्री सौ.मेघना साकोरे बोर्डीकर यांचे आश्वासन : प्रस्ताव मार्गी लावण्याचा संकल्प : महानगरपालिकेत आढावा बैठक🌟
परभणी (दि.०८ एप्रिल २०२५) : परभणी महानगर पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केलेल्या प्रस्तावांचा निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल नव्हे तो प्रस्ताव मंजूर करुन घेवू अशी ग्वाही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ.मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
येथील महानगरपालिका कार्यालयात काल सोमवार दि.०७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता पालकमंत्री सौ.मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भेट दिली तेथील आयुक्तांच्या बैठक कक्षात महापालिकेंतर्गत सर्व वरिष्ठ अधिकार्यांबरोबर हितगूज केले. महानगरपालिकेंतर्गत सुरु असणार्या विविध विकास कामांची माहिती घेतली. केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा घेतला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता भिसे, शहर अभियंता सुर्यकांत ठोंबरे, महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, उप अभियंता वसीम पठाण, सुधीर तेहरा, विभाग प्रमुख पाणीपुरवठा तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग तन्वीर बेग, विद्युत अभियंता सोहेल सिद्दीकी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, प्रमुख कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम याचे प्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग अभियंता आदी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री बोर्डीकर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते, नाली, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, अतिक्रमण, आरोग्य सुविधांबातही आढावा घेत दर्जानुरूप विकास कामे करण्याच्या सुचना दिल्या. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा नागरीकांना वेळेत लाभ देण्याच्या, उद्ष्टि पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. शासनाकडे सादर प्रस्तावांचा पाठपुरावा करून प्रस्ताव मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले......
0 टिप्पण्या