🌟या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव राजकुमार साहेबराव करडे असे आहे🌟
बिड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत मंगळवार दि.०१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास दोन युवकांनी सिनेस्टाईल पध्दतीने दिवसाढवळ्या अत्यंत निर्दयीपणे एका ३० वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात सदर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव राजकुमार साहेबराव करडे राहणार अंबाजोगाई असे असून त्याची हत्या प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येते दोन युवकांनी कोयतासदृश धारदार हत्याराने राजकुमारच्या गळ्यावर,डोक्यात,पाठीवर सपासप वार करून त्याची हत्या केली या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे......
0 टिप्पण्या