🌟काँग्रेस पक्षाने ओबीसी मतांसाठी केलेला ठराव निंदनीय - शिवसेना उपनेते संजय निरुपम

 


🌟यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याची काँग्रेसची भूमिका आहे असेही संजय निरुपम म्हणाले🌟

मुंबई :  राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने ओबीसी मतांसाठी केलेला ठराव निंदनीय असल्याची टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली आहे. अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने त्यांच्या मूळ भूमिकेशी पूर्णपणे युटर्न घेतला असून जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात ठराव न करता,काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याची काँग्रेसची भूमिका आहे अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली आहे.

मुंबईतील अंधेरी येथील निरुपम यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कॉंग्रेस पक्षाची आजवर जी काही राष्ट्रीय अधिवेशन झाली त्यात देशासाठी,आर्थिक उदारीकरणासाठी बॅंकांच्या राष्ट्रीयकरणाचे ठराव मंजूर केले होते. प्रत्येक अधिवेशनात काँग्रेसकडून भारतीय समाजात जाती, भाषा धर्माच्या नावाने विभक्त करणाऱ्या शक्तींचा विरोध करणारा ठराव केला जात होता असे निरुपम म्हणाले. मात्र अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने पूर्णपणे यू-टर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात काँग्रेसने कोणताच ठराव केला नाही. याउलट काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याचा काँग्रेसचा छुपा अजेंडा असून त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे निरुपम म्हणाले.

काँग्रेसची वाटचाल प्रादेशिक पक्षाच्या दिशेने

काँग्रेसची वाटचाल प्रादेशिक पक्षाच्या दिशेने सुरू झाली आहे. प्रादेशिक पक्षांकडून जाती धर्माचा आधारे व्होट बँकेचे राजकारण केले जाते, त्याप्रमाणे काँग्रेस राजकारण करते हे निंदनीय आहे, अशी टीका निरुपम यांनी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या