🌟तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने ती रक्कम गोठवण्याची कारवाई केली🌟
मुंबई : राज्यातील सायबर हेल्पलाईनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सायबर गुन्हेगारांना जबरदस्त चपराक देत सायबर गुन्हेगारांच्या घशात हात घालून तब्बल ११ कोटी रुपये वाचण्याचा कौतुकास्पद उपक्रम केला आहे कंपनीच्या बँक खात्याशी लिंक केलेले ई मेल अकाऊंट हॅक करत तब्बल ११ कोटी ३४ लाख रुपये आपल्या दोन बँक खात्यात वळते करून घेण्याचा सायबर गुन्हेगाराचा प्रयत्न सायबर हेल्पलाईनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने हाणून पाडला.
मुंबईतील पवई येथील तक्रारदाराने गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या १९३० क्रमांकाच्या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधून अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या बँक खात्याशी लिंक असलेले आपले ई मेल अकाऊंट हॅक करीत हा गुन्हा केल्याची माहिती दिली. गुन्हेगाराने त्या मेलवरून कंपनीचे खाते असलेल्या बँकेला ई मेलद्वारे एकूण ११ कोटी ३४ लाख ८५ हजार रुपये कंपनीच्या कामासाठी आपल्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यात वळते करण्याची सूचना दिल्याने बँकेने ती रक्कम वळती केली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने ती रक्कम गोठवण्याची कारवाई केली. त्यामुळे ११ कोटी ३४ लाखांपैकी ११ कोटी १९ लाख रुपये वाचले.याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.....
0 टिप्पण्या