🌟वासवी क्लब इंटरनॅशनलची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला - वासवी गव्हर्नर सुनीता वट्टमवार


🌟वासवी क्लब वनिता संस्कृती कपल हिंगोलीच्या अध्यक्ष सचिव व कोषाध्यक्ष च्या पदग्रहण प्रसंगी त्या बोलत होत्या🌟 


 हिंगोली :- वासवी क्लब इंटरनॅशनल ही जागतिक पातळीची आर्यवैश्य समाज संघटना असून मागील वर्षी पर्यावरण संतुलणार्थ एका दिवसात एक कोटी सीड बॉल जगभरात पसरवल्याने ह्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला झाल्याची माहिती वास्वी क्लब इंटरनॅशनलच्या गवर्नर आर्य वैश्य समाज भूषण सौ.सुनीता सतीश वट्टमवार ह्यांनी दिली.वासवी क्लब वनिता संस्कृती कपल हिंगोली च्या अध्यक्ष सचिव व कोषाध्यक्ष च्या पदग्रहण प्रसंगी त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या संघटनेच्या माध्यमातून आरोग्य,शिक्षण ,अपंग व ऊपेक्षित घटक कल्याण, आर्य वैश्य समाज आणि राष्ट्र कल्याण,पर्यावरण संतुलन आदी सेवा कार्य करून समाजोन्नती तून राष्ट्रोन्नती साधल्या जात आहे  उर्वरित कार्यकारणी ची निवड ह्यां तीन पदाधिकाऱ्यांनी करावी अस त्यांनी म्हंटल.   


                          
हिंगोली येथे वासवी क्लब वनिता संस्कृती कपल ची स्थापना झाल्यानंतर पदग्रहण  प्रसंगी वासवी क्लब इंटरनॅशनल उपाध्यक्ष डॉ.किरण चिद्रावार, आंतरराष्ट्रीय सह कोषाध्यक्ष सतीश वट्टमवार,अंतरराष्ट्रीय संचालक राजू रामराव मोतेवार, समाजसेवक आशिष पिंगळकर,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यकारिणी समन्वयक सौ.प्रणिता पराग कौलवार ह्यांनी पदग्रहण समारंभाचे प्रास्ताविक करून हिंगोली येथे सेवेसाठी हा क्लब तत्पर राहील अशी ग्वाही दिली.नूतन अध्यक्ष म्हणून सौ.श्रुती गिरीश बासटवार,सचिव पदी सौ.मंजुषा आशिष पिंगळकर, कोषध्यक्ष पदी सौ.अपर्णा गुंडेवार,मार्गदर्शक सौ. रुपाली विकास काप्रतवार, सौ. शिल्पा सचिन गुंडेवार,ह्यांचा सहभाग होता. पदग्रहण सौ.सुनीता वट्टमवांर ह्यांनी संपन्न केलं या प्रसंगी आंतरराष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष किरण चिद्रावार ह्यांनी जिथे जिथे आर्य वैश्य समाज आहे तिथे जगातील २६ देशात वासवी क्लब सेवारत आहेत तर जगभरात जवळपास २००० अन् राज्यात २५ क्लब कार्यरत असल्याने आपण अंतरराष्ट्रीय पातळीवर जोडल्या जावून सेवा कार्य जगभरात करू शकतो अस म्हणून शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय सह कोषाध्यक्ष सतीश वट्टमवार ह्यांनी वासवी क्लब इंटरनॅशनल च्या  माध्यमातून मोठे पुन्यायीचे कार्य होते म्हणून ही एक प्रकारची जन सेवा असली तरी ही इश सेवाच आहे,त्यामुळे पेराल ते उगवेल हे लक्षात ठेवून कार्य करा असा सल्ला दिला.आंतरराष्ट्रीय संचालक राजू रामराव मोतेवार ह्यांनी हिंगोली क्लब हा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त कसा होईल ह्या कडे आजपासूनच आखणी करून विविध क्षेत्रातील समाजसेवक आदींचे मार्गदर्शन घ्यावे आम्ही तर पाठीशी आहोतच असे म्हणून शुभेच्छा दिल्या.नूतन अध्यक्ष सौ.श्रुती गिरीश बासटवार व सचिव सौ. मंजुषा पिंगळकर ह्यांनी वासवी गवर्नर सौ.सुनीता वट्टमवार,राज्य आणि देशातील वासवी संघटनांच्या पदाधिकारी सोबत समन्वय  ठेवून आम्ही सर्व सेवारत राहुत अशी ग्वाही दिली.संचालन सौ.रुपाली विकास काप्रतवार,तर आभार सौ.शिल्पा सचिन गुंडेवार ह्यांनी मानले.वासवि क्लब च्या आचार संहिता प्रमाणे हिंगोली शाखेची उर्वरित बॉडी ची निर्मिती करण्यात  करण्यात येणार अस सांगण्यात आल. पदग्रहण समारंभ नंतर  पिगंळकर ह्यांच्या येथे वासवी गवर्नर सौ.सुनीता वट्टमवार ह्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार केला  हा आशीर्वादाचा सत्कार मला  आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्गक्रमण करण्यास निश्चितच बळ देईल अस सौ.सुनीता म्हणाल्या.सदरील कार्यक्रम सौ.प्रणिता कौलवार  ह्यांच्या जिम हॉल मध्ये झाला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या