🌟परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची उत्कृष्ट कामगिरी : बॅंकेने २ हजार कोटींवर ठेवींचा टप्पा केला पार....!


🌟शाखा व्यवस्थापक डि.एस.कदम यांनी योग्य नियोजन केल्याने बँकेने केली उत्तुंग कामगिरी🌟


सेलू (दि.१६ एप्रिल २०२५) -
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उत्तम कामगिरी करत दोन हजार कोटींच्या वर ठेवींचा टप्पा पार करत यशस्वी कामगिरी केली आहे.यामध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर,भगवान कऱ्हाळे, बी.ए.इक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक डी एस कदम यांनी योग्य नियोजन केल्याने बँकेने उत्तुंग कामगिरी केली आहे.

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गावोगावी ग्रामीण भागात जाऊन जवळपास खातेदारांना एटीएम चे वाटप केले आहे.तसेच ग्राहकांना उत्तम सेवा बँकेच्यावतीने देण्यात येत आहे.नुकताच आलेला विमा वाटपाचे गावनिहाय नियोजन करून खातेदारांना होणारा त्रास कमी होण्यासाठी शाखाधिकारी डी एस कदम हे प्रयत्नशील आहेत.बँकेवर ग्राहकांचा असलेला विश्वास कायम रहावा यासाठी बँकेचे सर्व कर्मचारी,शाखाधिकारी कदम,वरिष्ठ अधिकारी सतत प्रयत्नशील असलेले दिसतात.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या