🌟महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा परिसरात अवकाळी पाऊस गारपिटीमुळे अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान...!

🌟अवकाळी पावसाने ३ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरसह जालना,बीड जिल्ह्याला चांगलेच झोडपले🌟 

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात दि.२८ मार्च ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी वारे व अवकाळी पाऊस तसेच काही भागांत झालेल्या गारपिटीमुळे सुमारे २३५३.३८ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ३ एप्रिलला अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड आदी जिल्ह्यात अनेक भागात चांगलाच दणका दिला होता. प्रत्यक्ष अवकाळी पाऊस व गारपिटीने नेमके किती नुकसान केले याचा अंदाज घेण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले.

 माहितीनुसार बीड जिल्ह्यात २८ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान ३९ गावातील ४२८ शेतकऱ्यांच्या २११.३० हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये बीड तालुक्यांतील एका शेतकऱ्याच्या ६० गुंठ्यावरिल आंबा पिकाचे, आष्टी तालुक्यातील एका गावातील २०० शेतकऱ्यांच्या ८० हेक्टर ८० गुंठे क्षेत्रावरील कांदा, पेरू, संत्रा पिकाचे, पाटोदा तालुक्यातील एका गावातील तीन शेतकऱ्यांच्या ९० गुंठ्यावरील फळ पिकांचे तसेच अंबाजोगाई तालुक्यांतील २२४ शेतकऱ्यांच्या १२९ हेक्टरमधील फळ पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या