🌟गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ यांना देण्यात आले निवेदन🌟
या निवेदनावर हजुरी पाठी संघटनेचे अध्यक्ष स. दलजीतसिंघ बिशनसिंघ हजुरी पाठी, संघटनेचे उपाध्यक्ष स. प्रदीपसिंघ रागी, संघटनेचे सचिव स. जगदीपसिंघ नंबरदार यांच्या स्वाक्षऱ्याआहेत. निवेदनात नमूद केले गेले आहे की, गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेब येथे श्री अखंड पाठ, सप्ताह पाठ, जपजी साहेबचे पाठ, श्री दशम ग्रन्थ साहेबचेपाठ व जाप साहेबचे पाठ केले जाते. गुरुद्वारा बोर्डातर्फे पाठ करण्याचा मोबदला मानधन स्वरुपात दिला जातो आणी इतर ठिकाणाच्या तुलनेत ते मानधन खूप कमी आहे. गुरुद्वारात दोन तसांसाठी 200 /- रूपये दिले जाते. पण अन्य काही ठिकाणी दोन तासांसाठी 350 ते 400 रू दिले जात आहे. महागाईच्या काळात पाठीसिंघ यांना मिळणारा मानधन खूप कमी आहे. तेव्हा मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी हजुरी पाठी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.......
0 टिप्पण्या