🌟पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन......!


🌟प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन🌟


पूर्णा (दि.१४ एप्रिल २०२५) :-
पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात संविधान  निर्माते भारताचे पहिले कायदेमंत्री परमपूज्य बोधीसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३४ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.तर महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 या प्रसंगी महाविद्यालयात  ग्रंथालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथपाल डॉ. विकास काळे यांनी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:००  वाजेपर्यंत वाचकांसाठी ग्रंथ प्रदर्शन खुले असून वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या