🌟माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा येथे घरकुल हक्क परिषद व शेतकरी संपूर्ण कर्जमाफी मेळावा संपन्न...!


🌟यावेळी बच्चुभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती बाबत राज्य शासनावर सडकून टीका केली🌟


परभणी -
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत व नेतृत्वाखाली राज्य शासनाला कुंभकर्णाच्या झोपेतून जाग करण्यासाठी व जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि.१८ रोजी राजारामबापू सभागृह, जुना मोंढा पूर्णा येथे घरकुल हक्क परिषद व शेतकरी संपूर्ण कर्जमाफी भव्य मेळावा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू हे मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती बाबत राज्य शासनावर सडकून टीका केली प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंगभाऊ बोधने, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शिवहार सोनटक्के तालुकाप्रमुख पूर्णा, उद्भव गरुड तालुका प्रमुख परभणी, विष्णू भाऊ बोकारे, संजय वाघमारे, सचिन सोनकांबळे श्रीहरी इंगोले, विठ्ठल जोगदंड, बळीराम गुंडाळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या