🌟महाबोधी बहुउद्देशीय संस्था व नालंदा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात फिरते दहा दिवसीय श्रामनेर शिबिर🌟
परळी (दि.२५ एप्रिल २०२५) -परळी शहरात दहा दिवशीय फिरते श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्र चे संपादक वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की महाबोधी बहुउद्देशीय संस्था व नालंदा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने परळी शहरात फिरते दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ते 01 मे 2025 ते 09 मे 2025 पर्यंत विविध भागात चालणार असून यात दिनांक एक मे भिमवाडी 3 मे सारडगाव पाच मे शिरसाळा सहा मे वानटाकळी सात मे सोनपेठ आठ मे भीम नगर जगतकर गल्ली सुगंध कुटी बौद्ध विहार 9 मे भिमवाडी अशा प्रकारे या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक बौद्ध भगिनी सीमाताई कांबळे यांनी आयोजन केले असून या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पूज्य भदंत नागघोष महाथेरो अध्यक्ष महाराष्ट्र बौद्ध संस्था. कार्यक्रमाचे उद्घाटक पूज्य भदंत डॉ.हर्षबोधि महाथेरो उपाध्यक्ष म. बौ. संस्था या कार्यक्रमाचे ध्वजारोहण पूज्य भदंत चंद्र बोधी थेरो दिल्ली. तर प्रमुख मार्गदर्शक पूज्य भदंत धम्मदीप महाथेरो अध्यक्ष भीम जन्मभूमी महू तर या श्रामनेर शिबिराला मार्गदर्शन करण्याकरता पूज्य भदंतशील रत्न थेरो वटफळी पूजे भदंत एस राहुल औरंगाबाद. भदंत अश्वघोष वटफळी वट फळा पूज्य भदंत महामोग्लयान परभणी पूज्य भंते महामोग्लयान वटफळी पूज्य आर्याजी भिकुजी रूपनंदा श्रीलंका रिटर्न तसेच भिकू भिकुनी संघ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत नवव्या दिवशी श्रामनेर शिबिराचे समापन होणार असून त्या निमित्ताने धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बौद्ध विहार येथे सर्व भिकू संघ व श्रामनेर यांना भोजन दान करण्यात येणार असून सायंकाळी ठीक सात वाजता धम्मदेशना होणार आहे. तरी जास्तीत जास्त परळी शहरातील बौद्ध बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्रचे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या