🌟अमेरिकन टॅरिफच्या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढू' असा इशारा देखील चीनने अमेरिकेला दिला आहे🌟
बीजिंग : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण जगात गदारोळ माजवल्याचे दिसत असून आता अमेरिकेने चीनवर १०४ टक्के टॅरिफ ९ एप्रिल २०२५ पासून लागू करण्याचे काल मंगळवार दि.०८ एप्रिल २०२५ रोजी जाहीर केले यामुळे टॅरिफयुद्ध अधिकच चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान 'आम्ही अमेरिकेचे ब्लॅकमेलिंग कदापीही स्वीकारणार नाही अमेरिकन टॅरिफच्या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढू', असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.
चीनने सांगितले की, १०४ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादून अमेरिका चुकांमागून चुका करत आहे. या चुका अमेरिकेलाच महागात पडतील, असे चीनने म्हटले आहे. अमेरिका आपल्या मर्जीप्रमाणे चालण्यासाठी मनमानी करत असल्यास चीनही याबाबत शेवटपर्यंत लढेल. व्यापार युद्धासाठी चीन तयार आहे. यातून चीन अधिक मजबूत देश म्हणून उदयास येईल. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होईल, पण आभाळ कोसळणार नाही, असे चीनने म्हटले आहे सन २०१७ मध्ये अमेरिकेने पहिल्यांदा व्यापार युद्धाची सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकेने आमच्यावर दबाव आणला. तरीही आम्ही विकास करून दाखवला आणि पुढे गेलो. आम्ही लवचिकपणा दाखवला. आमच्यावर जेवढा दबाव येतो, तितके आम्ही मजबूत बनतो, असे चीनने सांगितले.
जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था चीन आहे. तसेच मोठी बाजारपेठही आहे. आंतरराष्ट्रीय बदलत्या परिस्थितीनुसार, आम्ही जगासाठी आमचे दरवाजे खुले ठेवणार आहोत ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, जो देश अमेरिकेविरोधात प्रत्युत्तरादाखल कारवाई करेल. त्याला अधिकाधिक टॅरिफचा सामना करावा लागेल. तसेच चीनसोबतच्या बैठका थांबवल्या जातील, तर अन्य देशांसोबत बैठका सुरू होतील.
💫सिंगापूरमध्ये कंपन्यांच्या संरक्षणासाठी कृती दल स्थापन :-
अमेरिकन टॅरिफमुळे सिंगापूरमधील कंपन्या व कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी सिंगापूर सरकारने कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केला आहे, अशी घोषणा सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी केली. उपपंतप्रधान व व्यापार मंत्री गान किम याँग यांच्या अध्यक्षतेखाली हे कृती दल स्थापन करण्यात आले आहे. यात आर्थिक संस्था, सिंगापूर बिझनेस फेडरेशन, सिंगापूर एम्प्लॉईज फेडरेशन व कामगार संघटनांचा समावेश आहे. जागतिक परिस्थिती 'अस्थिर' बनली आहे. असे सांगून पंतप्रधान वाँग म्हणाले की, कृती दल उद्योगांना आणि कामगारांना तत्काळ अनिश्चिततेचे निराकरण करण्यास, लवचिकता आणण्यास आणि नवीन आर्थिक परिदृश्याशी जुळवून घेण्यास मदत करेल.
💫चिन हॉलिवूड सिनेमांवर देखील बंदी घालणार :-
व्यापार युद्धाचा फटका आता अमेरिकन चित्रपटसृष्टीलाही बसण्याची शक्यता आहे. हॉलिवूडच्या सिनेमांवर बंदी घालण्याचा विचार चीनने चालवला आहे. ही बंदी घातल्यास अमेरिकन चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान होऊ शकते.....
0 टिप्पण्या