🌟मराठवाडा विभागीय 'प्रदेशाध्यक्ष' पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟
परभणी (दि.०९ एप्रिल २०२५) :- संपूर्ण राज्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नव्या दिशांचे नव्या दुरदृष्टीच्या नेतृत्वांची गरज आहे राज्यात रिपब्लिकन सन्मान सभा"चे काम एका नव्या एक सामाजिक दूरदर्शी नेतृत्वाचा मार्ग सुरू झाले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वनातून शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,एक संघर्षमय प्रवास व दिशा देण्याचे काम केले त्या नागसेन भूमीतून रिपब्लिकन सन्मान सभाने सुध्दा एक नव्या उर्जा...नवी दिशा...नवा संकल्प...संघटनेने हाती घेतला आहे.
रिपब्लिकन सन्मान सभाची एक नव्या नेतृत्वांची उर्जा..! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक चळवळीचे ध्येय व धोरणांवर अभ्यास करून त्यांच्या विचारांवर काम करणार असे, डॉ. रोडे यांनी स्पष्ट मत मांडले. रिपब्लिकन सन्मान सभाच्या विभागीय स्तरावर आठ जिल्हांचे काम चालू केले आहे. आज विभागीय बैठकीत रिपब्लिकन सन्मान सभा च्या मराठवाडा विभागीय प्रदेशाध्यक्ष पदी रविंद्र मारोतीराव नरवाडे(कांडलीकर) तर मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पदी पृथ्वीराज निर्मळ यांची सर्वाुमते निवड करण्यात आली.
परभणी जिल्हातील पुर्णा येथील रविंद्र नरवाडे पत्रकार, संपादक, सामाजिक कार्य, गेली वीस वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करत आहेत रविंद्र नरवाडे हे धाडसी,जिद्दी,एकनिष्ठ आंबेडकरी सामाजिक शैक्षणिक कार्य करत आहेत त्यांनी स्वतःचे वृत्तपत्राच्या माध्यमातून परभणी,नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण पिढीला प्रेरणादायी व्यक्त महत्त्व आहे तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकाराचे मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्या सामाजिक व शैक्षणिक, पत्रकारिता, आंबेडकरी चळवळीचे कार्य लक्षात घेऊन पत्रकार व संपादक. रविंद्र मारोतीराव नरवाडे यांना मराठवाडा विभागीय प्रदेश अध्यक्ष पदाची "रिपब्लिकन सन्मान सभाच्या" एक नवी जबाबदारी देण्यात आली आहे. श्री. रविंद्र नरवाडे यांनी विभागीय स्तरावर सामाजिक, शैक्षणिक, एक नव्या उर्जा युवकांना सोबत घेऊन संघटन, संकल्पना, संघटक, बांधणीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे आहेत.
रिपब्लिकन सन्मान सभाचे प्रा.डॉ.दशरथ वैजनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागीय बैठक संपन्न झाली. या प्रसंगी राजकूमार धिवार, अजय गोरे, विश्वास गायकवाड, संदेश हवने, श्रीकात राणे, जितेंद्र वलंवे, नितिन सांगळे, उमेश रोडे, आनंद भुतके, गोदाम, कांबळे, चंद्रमाने, , जालना, जीवन दिने, हरीभाऊ जावळे, भिसे, गायकवाड, हिंगोली, रामकृष्ण सिरसाठ, रणखांब राम , विविध जिल्ह्यांतील सभासदांना मार्गदर्शन केले. मराठवाडा बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर, जालना छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील असंख्य वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
______________________________________
0 टिप्पण्या