🌟कु.सृष्टी पांडुरंग अंभुरे यांच्या कर्तुत्वाचा 'महिला उन्नती' तर्फे पुरस्काराने सन्मान....!


🌟जेष्ठ पत्रकार मदन (बापू) कोल्हे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पुरस्कार देऊन सन्मान🌟

परभणी :- शिक्षित नारी - सशक्त नारी हे ब्रीदवाक्य घेऊन 'मिशन शक्ती अभियानात, नारी सुरक्षा- नारी सन्मान- नारी स्वावलंबन' वर भर देऊन ,राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या 'महिला उन्नती संस्था भारत' तर्फे परभणीची अभिमानाने मान उंचावणारी, प्रभावती नगरीची शान, राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त खेळाडू कु.सृष्टी पांडुरंगराव अंभोरे हिचा महिला उन्नती संस्था चे महाराष्ट्र प्रभारी ,जेष्ठ पत्रकार मदन(बापू) कोल्हे, प्रदेश अध्यक्ष, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

 परभणी येथील गजानन नगर मध्ये , महिला उन्नती संस्था-भारत तर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात,मराठ वाडा मिडीया चीफ देवानंद शंकराव वाकळे ,विठ्ठोबा चे कार्यकारी संपादक  प्रवीण  मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती .

यावेळी सर्व प्रथम कु.सृष्टी अंभुरे यांचे पिता,वुशू क्रिडा व तलवार बाजी चे कोच श्री.पांडुरंग अंभुरे यांचा पुष्पहाराने तर माता सौ.सारिकाताई अंभुरे यांना ' महिला उन्नती ' चे सन्मान  चिन्ह देवुन गौरविण्यात आले कु.सृष्टी पांडुरंग अंभूरे यांनी आतापर्यंत,वुशू  क्रिडा प्रकारात  व तलवारबाजी मध्ये प्राविण्य मिळवून,   खेळामध्ये राष्ट्रीय पारितोषिक मिळविण्याबरोबरच उच्च शिक्षण घेऊन,क्रिडा कोट्यातून  ' कृषी सहाय्यक (ॲग्री.असिस्टंट) या पदावर कार्यरत होऊन स्वावलंबी होण्याचा प्रवास ,सर्वच तरुणी व महिलांना आदर्शवत असून प्रेरणादायी आहे. परभणी येथील क्रीडा ,सामाजिक, धार्मिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे,लोकप्रिय व्यक्तिमत्व श्री पांडुरंग अंभुरे यांच्या त्या कन्या आहेत .

वरील राष्ट्रीय पातळीवरील महिलांच्या मानांकित संस्थेद्वारा कु.सृष्टी अंभुरे यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे ,तसेच कु.सृष्टी चे आई-वडिलांवर ही सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या