🌟नांदेड येथील गुरूदास हुनमान मंदिर मध्ये हनुमान जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार......!


🌟जयंती महोत्सवात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य सेवादार स.मनजीत सिंघ संधू यांनी केले आहे🌟 

नांदेड :- नांदेड शहरातील पवित्र तख्त श्री संचखड गुरूद्वाऱ्याच्या मागील बडपुरा गेट नंबर चार येथील पुरातन हनुमान मंदिर श्री गुरुदास हनुमान मंदिर येथे शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जयंती महोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. 


शनिवार दि.१२ एप्रिल रोजी सकाळी पुजा अर्चना झाल्यानंतर दुपारी १२.०० ते ०३.०० वाजेपर्यंत भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या हनुमान जयंती महोत्सवा निमित्त सर्व भाविकांना हनुमान मंदिर समिति च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की सर्वांनी जयंती महोत्सवात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मुख्य सेवादार स.मनजीत सिंघ संधू यांच्या वतीने प्रसारित करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या