🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟पहलगाममध्ये भीषण धर्मांध दहशतवादी राक्षसांचा निरपराध पर्यटकांवर बेछूट गोळीबार : बेछूट गोळीबारात २७ निरपराध पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू🌟

1.जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी राक्षसांचा निरपराध पर्यटकांवर बेछूट गोळीबार : बेछूट गोळीबारात २७ निरपराध पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू ; 'टीआरएफ'ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

2. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारचं एक पाऊल मागे, मोठ्या विरोधानंतर हिंदी'अनिवार्य' शब्द हटणार, पण त्रिसूत्री शिक्षण पद्धतीत दुसरी भारतीय भाषा निवडावीच लागणार, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच ; विचार करुन निर्णय घेतला असता तर माघार घेण्याची वेळ आली नसती, राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया 

3. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानं 4 लाख 63 हजार मच्छिमारांना होणार फायदा, तर गोसीखुर्द प्रकल्पाला 25 हजार कोटींचा निधी, भंडारा-चंद्रपूर-नागपूरच्या शेतकऱ्यांना होणार लाभ ;  राज्यातील मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे स्वस्त कर्ज आणि वीज मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नितेश राणेंची माहिती 

4. राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य, राज ठाकरे 30 एप्रिलला तर उद्धव ठाकरे 4 मे रोजी परदेशातून परतणार ; उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक, राज ठाकरे मुंबईत आले की चर्चा करू, संजय राऊतांची माहिती ; उद्धव ठाकरे हे मुंबईतील लॅण्ड स्कॅमचे बादशाह, भाजप नेते आशिष शेलार यांची टीका 

5. युगेंद्र पवारांची तुलना अजितदादा किंवा माझ्याशी नको, सत्ता नसताना तो काम करतोय; शरद पवारांचा सल्ला ; एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं? अक्षता टाकू द्या, वाढदिवसाला शरद पवारांकडून नातू युगेंद्रला खास शुभेच्छा 

6. राधाकृष्ण विखे पाटील मला म्हणायचे, संग्राम निर्णय घे, पण मी काँग्रेसमध्येच राहिलो, पण आता नाही, भाजप प्रवेश करताच संग्राम थोपटेंनी जाहीर भूमिका मांडली ; आपल्याला कोहिनूर हिरा मिळालाय, संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश, चंद्रशेखर बावनकुळेंचा आनंद गगनात मावेना 

7. आधी विधवा महिलेचा जीव घेतला, नंतर संशयिताने कडुनिंबाच्या झाडाला दोर लावून स्वतःलाही संपवलं, नाशिकच्या सिन्नरमधील धक्कादायक घटना ; बॉयफ्रेंडच्या बदनामीच्या धमक्यांना कंटाळून 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या, मृतदेह प्रियकराच्या घरी सापडला, जालन्यात खळबळ ; तुमची मुलगी मला द्या, गावगुंडाची शिक्षकाला धमकी, ट्रॅक्टर थेट गाडीवर चढवला, बीडमधील धक्कादायक घटना 

8. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पर्यटकांचा मृत्यू तर 12 जण जखमी, जखमींमध्ये चार जण महाराष्ट्रातले, सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन सुरू 

9. देशभरात चंद्रपूर सर्वात हॉट, सलग दुसऱ्या दिवशी पारा 45.6 अंशांवर ; हवामान खात्याचा विदर्भाला हायअलर्ट, पुढील दोन दिवसांत सूर्य आग ओकणार, उष्णतेच्या लाटेचा इशारा 

10. लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतर सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ, जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा दर 1 लाख 2 हजारांवर

11. गुजरातचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, मुंबईचं पुनरागमन, चेन्नई बाहेर; गुणतालिकेत मोठे उलटफेर, ऑरेंज अन् पर्पल कॅप कोणाकडे?  रोहित, विराटला 7 कोटी रुपये, शुभमन, हार्दिक, ऋषभपासून श्रेयस, सूर्यकुमारपर्यंत अनेक खेळाडूंना कोट्यवधींची रक्कम,  बीसीसीआयचा 2024-25 हंगामासाठी वार्षिक करार जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षेत पुण्याच्या आर्चित डोंगरेने झेंडा फडकवला, महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा येण्याची कामगिरी 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या