🌟वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला....!


🌟काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टिका🌟

मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने संसदेत मांडलेले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक राज्यसभा व लोकसभेत मंजूर झाल्यानंतर देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की भाजप सरकारने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन अजित पवार यांनी सत्तेसाठी भाजपापुढे लोटांगणच घातल्याचा घणाघाती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांचा पक्ष भाजपाच्या मदतीने चोरून पक्षाचे नाव व चिन्ह घेतले व सत्तेसाठी धर्माधशक्तीच्या बाजूला जाऊन बसले. आपण विकासासाठी सत्तेत सहभागी झालो असलो तरी पुरोगामी विचार सोडला नाही, असे ते म्हणाले.....

💫मुस्लिम समाजात दहशत बसवून लाखो एकर जमीन ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा डाव ?

वक्फ विधेयक हे केवळ मुस्लिम समाजात दहशत बसवून लाखो एकर जमीन ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. धारावीसह अनेक महत्वाच्या जमिनी एका विशेष उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजपा सरकारने लावला आहे. उद्या वक्फच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनी हे सरकार लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालणार आहे हे अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला माहित नाही, असे नाही पण सत्तेशिवाय राहू न शकणाऱ्या अजित पवारांनी खुर्चीसाठी भाजपासमोर लाचार होऊन विधेयकाला पाठिंबा दिला आहे, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या