🌟महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने सुधारित पीकविमा योजनेला दिली मान्यता.....!

 


🌟पीकविमा योजनेत वाढलेल्या गैरप्रकारामुळे सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :-  महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने सुधारित पीकविमा योजनेला परवानगी दिली आहे पीक विमा योजनेत केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई आणि एक रुपयात विमा योजना बंद करण्याचा प्रस्ताव होता पीकविमा योजनेत वाढलेल्या गैरप्रकारामुळे सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विमा योजनेतून शेतकऱ्यांना सध्या पेरणीच न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळते. त्यातही पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत (ट्रीगर्स) जास्त भरपाई मिळत असते. तर पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई कमी मिळते. पण पीकविमा योजनेत वाढलेल्या गैरप्रकारांमुळे विमा योजनेत बदल करण्याची शिफारस करण्यात आली होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या