🌟पाथरी पंचायत समिती सभागृहात ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर🌟
परभणी : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातल्या ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज येथील पंचायत समिती सभागृहात उपविभागिय अधिकारी शैलेश लाहोटी,तहसिलदार शंकर एन हानदेशवार, गटविकास अधिकारी मधुकर कदम, नायबतहसिलदार वसंत महाजन,महसुल सहायक गजानन अन्नपुर्व यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहिर करण्यात आले.
२२ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृहात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत २८ ग्रामपंचायत या सर्वसाधारण खुल्या गटा साठी आहेत यात १४ ठिकाणी पुरुष तर १४ ठिकाणी महिलाराज असणार आहे. यात सर्वसाधारण पुरुषा साठी पोहेटाकळी,खेर्डा/सारोळा खु. ,पाथरगव्हाण खु.,निवळी, गुंज खु. ,डाकूपिंप्री/तारुगव्हाण,मरडसगाव/श्रीरामपुर वस्ती, उमरा, वडी, रेणाखळी, जवळाझुटा ,हादगाव, रामपुरी खु., आनंदनगर, तर महिलां साठी पाटोदा गं की,सारोळा बु., गौंडगाव,बाबुलतार, सिमुरगव्हाण, कासापुरी, अंधापुरी,देवेगाव, वाघाळा, देवनांद्रा, कान्सुर/कान्सुरतांडा, बाभळगाव, वरखेड/किन्होळा, ढालेगाव या ग्रामपंचायतींचा सामावेश आहे तर अनसुचित जाती साठीच्या आठ जागेत पुरुष चार तर महिला चार ठिकाणी कारभार पहाणार आहेत यात पुरुषां साठी मंजरथ, लिंबा/लिंबा तांडा, लोणी बु. , मसला/मसला तांडा तर महिला अ जा साठी बांदरवाडा, मुदगल, बोरगव्हाण, पाथरगव्हाण बु.नागरीकांच्या मागास प्रवर्गा साठी तेरा ग्रामपंचायत मध्ये सात पुरुष तर सहा ठिकाणी महिलाराज असणार आहे. यात पुरुषां साठी खेडूळा, विटा बु., नाथरा, तुरा, चाटेपिंपळगाव, फुलारवाडी तर महिलां साठी झरी,बानेगाव, गोपेगाव, जैतापुरवाडी/समर्थनगर, रेणापुर, डोंगरगाव अशा प्रकारे सोडत निघाली.
सरपंच सोडत कार्यक्रम यशस्वी करण्या साठी कृषी विस्तार अधिकारी संदिपान घुंबरे, मनेरे, बिरादार यांनी परिश्रम घेतले. सरपंच सोडत कार्यक्रमा साठी तालुक्यातील विविध गावचे सरपंच पदाधिकारी यांची उपस्थिती होती.....
0 टिप्पण्या