🌟पुर्णेतील अभिनव विद्या विहार प्रशालेतील चौथ्या वर्गातील सोहम लोखंडे याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन...!


🌟सोहमने ज्वारीच्या दाण्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर प्रतिकृती तयार करून अनोख्या पद्धतीने केले अभिवादन🌟

पुर्णा :- पुर्णा शहरातील अभिनव विद्या विहार प्रशाला या शाळेत इयत्ता चौथी वर्गात शि‌क्षण घेत असलेल्या मधील सोहम रमेश लोखंडे अलंकार नगर पूर्णा या विद्यार्थ्याने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त ज्वारीच्या दाण्यापासून त्यांची सुंदर प्रतिकृती तयार करून अनोख्या पद्धतीने महामानवास अभिवादन केले.


अवघे दहा वर्षे वय असलेल्या सोहमने ज्वारीच्या दाण्यांचा उपयोग केला असून त्यासाठी त्याला घरातील ज्वारी आणि इतर साहित्य यासाठी वीस रुपये खर्च आला. त्याने पाच तास अथक परिश्रम करून सदरील कलाकृती तयार केली आहे. ही कलाकृती तयार करण्यासाठी त्याचे काका असलेले पूर्णा येथील प्रसिद्ध रांगोळीकार श्री सुरेश लोखंडे प्राथमिक शिक्षक हटकरवाडी यांनी मार्गदर्शन केले

सदरील कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा प्रकारच्या कलाकृती बनवण्याची आवड त्याला लहान वयापासूनच आहे सोहमने घरी आई ज्वारीचे दळण करत असताना पाहिले आण त्याच्या डोक्यात ज्वारीच्या दाण्यापासून एखादी कलाकृती तयार करावी अशी कल्पना सुचली म्हणून त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औत्सुक्य साधून ही अभिनव अशी कला सादर केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या