🌟'पलायन रोको-नौकरी दो' पदयात्रा काढणाऱ्या कॉंग्रेस नेते कन्हैया कुमार यांना पोलिसांनी केली अटक🌟
पटना : बिहार राज्यातील वाढती बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार यांनी पदयात्रेला सुरुवात केली होती त्यांनी काढलेल्या पदयात्रे विरोधात एक्शन घेत बिहार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याची योजना आखली होती.
कन्हैया कुमार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भेटून निवेदन देणार होते 'पलायन रोको-नौकरी दो' या यात्रेच्या शेवटी कन्हैया कुमार यांनी हे नियोजन केले होते पण पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिव प्रकाश गरीब दास यांना सुद्धा अटक झाली. कृष्ण मुरारी यांनी सांगितले की, जे लोक आंदोलनाचे नेतृत्व करत होते, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे. सगळ्यांना कोतवाली पोलीस स्टेशनला नेले जात आहे. या लोकांना आधी शांतपणे आंदोलन करण्याची सूचना दिली होती. पण जमाव खूप आक्रमक झाला, त्यामुळे पाण्याचे फवारे मारावे लागले.
0 टिप्पण्या