🌟नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक पदाचा पदभार प्रदीप कामळे यांनी स्विकारला.....!


🌟नुतन विभागीय व्यवस्थापक प्रदीप कामळे यांनी मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये पदवी प्राप्त केली आहे🌟

नांदेड (दि.०४ एप्रिल २०२५) : नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक पदाचा पदभार नुतन विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामळे यांनी आज शुक्रवार दि.०४ एप्रिल रोजी स्विकारला.

          नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे नुतन विभागीय व्यवस्थापक प्रदीप कामळे यांनी मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये पदवी प्राप्त केली आहे ते भारतीय रेल्वे यांत्रिकी सेवा (इंडियन रेल्वे सर्विस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स) १९९४ बॅचचे अधिकारी आहेत नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून रुजू होण्यापूर्वी  प्रदीप कामळे  यांनी भारतीय रेल्वे मध्ये आपल्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत दक्षिण रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये विविध महत्वाच्या पदावर कार्य केले आहे.

             आपल्या पहिल्या पोस्टिंग मध्ये प्रदीप कामळे हे दक्षिण मध्य रेल्वेच्या मद्रास विभागात सहाय्यक यांत्रिकी अभियंता म्हणून १९९८ मध्ये  रुजू  झाले. त्यानंतर त्यांनी कोचिंग डेपो ऑफिसर बिलासपुर येथे कार्य केले. नागपूर येथे वरिष्ठ यांत्रिकी अभियंता, बिलासपूर येथे मुख्य यांत्रिकी अभियंता, मोतीबाग येथे मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक, रायपूर येथील वॅगन रिपेयर वर्कशॉपमध्ये मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता म्हणून कार्य केले. ते प्रतिनियुक्तीवर नागपूर येथील मोईल येथे  मुख्य दक्षता अधिकारी म्हणून जवळपास ०३ वर्ष कार्यरत होते नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदी रुजू होण्यापूर्वी ते बिलासपुर येथे मुख्य यांत्रिकी अभियंता डीजेल आणि आपत्ती व्यवस्थापन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे कार्यरत होते.  भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/ जमालपूर, INSEAD / सिंगापूर आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर लीडरशिप इन फायनान्स / मलेशिया यासारख्या प्रतिष्ठित रेल्वे संस्थांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.

              मोतीबाग वर्कशॉपमध्ये बायो टॉयलेट आणि इनोकुलम जनरेशन प्लांटच्या प्रोटोटाइप डेव्हलपमेंट कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या काळात मोतीबाग वर्कशॉपमध्ये नॅरोगेज ते ब्रॉडगेज रोलिंग स्टॉक देखभालीचे कामही करण्यात आले. नागपूर विभागात त्यांच्या कार्यकाळात मोतीबाग आणि नागपूर येथील नॅरोगेज संग्रहालयांचा विकासही करण्यात आला २१ मार्च २०२३ रोजी नांदेड विभागात रुजू झालेल्या श्रीमती नीति सरकार, IRAS यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या