🌟परभणीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडविण्याचा आंदोलनकर्त्यांचा प्रयत्न.....!


🌟पिकविम्याबाबत केलेल्या विधानाचा निषेध : आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात🌟

परभणी (दि.२६ एप्रिल २०२५) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शनिवार दि.२६ एप्रिल रोजीच्या परभणी दौर्‍या दरम्यान संतप्त आंदोलनकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मागे सरकवून ताब्यात घेतले.

            शेतकरी संघटना, काँग्रेस, राज्य किसान सभा व कम्युनिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिक विमा योजने संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबद्दल तीव्र रोष व्यक्त केला. शेतकर्‍यांनी पिक विमा योजनेत चूना लावला या विधानाबाबत संतप्त आंदोलनकर्त्यांनी कोण लावतंय कोणाला चूना ? असा सवाल केला. पिक विमा योजनेबाबत उपमुख्यमंत्र्यांचे हे विधान आगीत तेल ओतण्यासारखे आहे. आधीच पिक विमा कंपन्यांनी लाभासाठी चालविलेल्या या योजनेतून हजारो शेतकर्‍यांना चूना लावला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनात खदखद आहे, असे मत संतप्त आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. काही आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या या ताफ्यावर चूना फेकण्याचा प्रयत्न केला.

           दरम्यान, पोलिसांनी गोंधळ उडण्यापूर्वीच तातडीने या आंदोलनकर्त्यांना मागे सरकवत ताब्यात घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या