🌟न्या.यशवंत वर्मा यांनी शनिवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली🌟
अलाहाबाद : निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर अवैध रोख रक्कम सापडल्यामुळे चर्चेत आलेले न्या. यशवंत वर्मा यांनी शनिवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तथापि, त्यांना कोणतेही काम दिले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे न्यायमूर्तीच्या शपथविधीसाठी सार्वजनिक समारंभ आयोजित केला जातो, परंतु न्या. वर्मा यांनी आपली शपथ एका खासगी कक्षात घेतली.
0 टिप्पण्या