🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟निवडणुका होईनात, मनसेनं मुंबईत भरवलं प्रतिपालिका सभागृह ; आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण🌟 

1. अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, मुंबईत सराफ बाजारात एक लाखांचा टप्पा ओलांडला ; पुण्यात 96,200; जळगावात 99600, सोने दराचा नवा उच्चांक

2. शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म,ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु असताना सामनाच्या अग्रलेखाने संपूर्ण महाराष्ट्राचं वेधलं लक्ष ; महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात थारा देऊ नये असे उद्धव ठाकरेंनी सांगितले, त्यामागे एक वेदना आहे; सामना अग्रलेखातून पुन्हा राज ठाकरेंना साद ; उद्धव ठाकरेंनी ठरवलंय एक पाऊल पुढे टाकायचं, भूतकाळात जायचं नाही; खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

3. इकडं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा, तिकडे  पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठकांचा धडाका, काका-पुतण्यात मनोमिलन होणार असल्याची चर्चा  ; कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येणं हा पवार कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे, परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा , शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संजय राऊतांना टोला  

4. निवडणुका होईनात, मनसेनं मुंबईत भरवलं प्रतिपालिका सभागृह ; आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण ;  मराठी संस्कृतीचा बालेकिल्ला असणाऱ्या पार्ल्यात जैन समाजाच्या मोर्चामुळे पालिकेच्या अधिकाऱ्याची बदली - संजय राऊत 

5. माढ्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर, शिवाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तानाजी सावंतांचं नावच नाही, एकनाथ शिंदेंची कार्यक्रमाकडे पाठ 

6. माजी खासदार संजयकाका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, त्यामुळे त्यांचं पुर्नवसन अजितदादांनी करायचं, मी त्यांना मदत करणार, मंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही 

7. भापजने रोहित पवारांचे 12 पैकी 8 नगरसेवक फोडले, कर्जत नगरपंचायतीत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंची सत्ता ; नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव नाट्य कसं रंगल, सभापती राम शिंदेंनी आमच्या नगरसेवकांना पैशाचं आमिष दाखवलं, नगराध्यक्षपदाचा राजीनामा देताना उषा राऊत यांची प्रतिक्रिया 

8. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल अखेर लागला ; मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप आणि 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा  ;  बारा लाखांची स्पोर्ट्स बाईक अन् डोक्यावर 70 हजारांचे हेल्मेट; कोल्हापुरातील उद्योजकाचा मुलाचा अपघाती मृ्त्यू, हेल्मेटचे सुद्धा तुकडे ; झिपलाईनिंग करण्यासाठी 30 फूटावर गेली, दोर अडकवण्यास स्टूलवर चढताच पाय सटकला ,पुण्यात तरुणीचा मृत्यू 

9.  फॅन्ड्री पिक्चरमधील शालू राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चर्चा, बाप्तिस्माचे फोटो शेअर, अभिनेत्री राजेश्वरी खरातच्या फोटोवर चाहत्यांचा कमेंटचा पाऊस ;  पाचशे रुपयात मत विकणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये, अभिनेत्री राजेश्वरी खरातचे शालजोडे, म्हणाली, माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातच! 

10. रोहित शर्मासह चौघे A+, BCCI कडून केंद्रीय करार जाहीर, अय्यर-ईशान किशनची एन्ट्री ; बीसीसीयकडून 34 खेळाडूंवर पैशांचा पाऊस, 9 खेळाडूंना करारातून डच्चू

11.कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे प्रदीर्घ आजाराने 88 वर्षी निधन; गेल्या 1 हजार वर्षांमध्ये पहिले गैर युरोपियन पोप होण्याचा मिळवला होता बहुमान  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या