🌟डॉ.हवा मल्लिनाथ महाराज निरगुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत महू (डॉ.आंबेडकर नगर) मध्य प्रदेश येथे पुरस्कार प्रदान🌟
नांदेड : गुरु नगरी नांदेड मधील सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारे आघाडीचे कार्यकर्ते सरदार महेंद्रसिंघ पैदल यांना श्रीश्रीश्री हवा मल्लिनाथ महाराज सेवाभावी संस्थेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने १४ एप्रिल रोजी डॉ. हवा मल्लिनाथ महाराज निरगुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत महू (डॉ.आंबेडकर नगर) मध्य प्रदेश येथे भव्य जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज सेवा भावी संस्थेचे संस्थापक सिद्धार्थ तलवारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सरदार महेंद्र सिंघ पैदल यांना या पुरस्काराचे महू येथे वितरण करण्यात आले. सरदार महेंद्रसिंघ पैदल यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुलगुंडे,नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, सुभाष बल्लेवार, तुलसीदास भुसेवार, प्रा के एच दरक, जी नागय्या, विनायक पाथरकर, गंगाधर पांचाळ, प्रा राजेश मुखेडकर,प्रलादराव भालेराव,जे एच पिन्नलवार, तुकाराम कोटुरवार,डॉ गजानन देवकर,श्रेयस कुमार बोकारे,पुंडलिक बेलकर,गोपाल पेंडकर,धनंजय उमरीकर यांनी अभिनंदन केले आहे......
0 टिप्पण्या